महाराष्ट्रात मुलींना आता मिळणार एक लाख एक हजार रूपये | लेक लाडकी नवीन योजना सर्व माहिती | Deehindavi

 

महाराष्ट्रीयन-मुलींना-आता-मिळणार-एक-लाख-एक-हजार-रूपये-लेक-लाडकी-नवीन-योजना-सर्व-माहिती-Deehindavi
महाराष्ट्रीयन मुलींना आता मिळणार एक लाख एक हजार रूपये | लेक लाडकी नवीन योजना सर्व माहिती


लेक लाडकी नवीन योजना सर्व माहिती

मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, कुपोषण कमी करणे, मुलीचा मृत्यू दर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शुन्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी 'लेक लाडकी' योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. ह्या योजनेचा लाभ फक्त पिवळ्या व केशरी राशनधारक कुटुंबांनाच मिळणार आहे. मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, आणि त्या नंतर मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रूपये, त्या नंतर अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाणार. त्या नंतर लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख दिले जाणार आहे. राज्यात मुलींना या योजनेचा लाभ मिळणार.

शासनामार्फत लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना देण्यात येणार.

योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयार्फत करण्याकरिता पोर्टल तयार करून लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालयस्तरावर एक कक्ष निर्माण  करण्यात येणार आहे.

  या योजनेसाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्ती लागू.

१). ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल 2023 रोजी व जन्माला येणाऱ्या एक आणि दोन मुलींना लागू राहील.


२). मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील, पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना आई, वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अवश्य राहील.


3). दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यावर एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र, त्यानंतर आई / वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्र क्रिया करणे आवश्यक आहे..


४). १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी व एक मुलगा आहे व त्या नंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.


५). लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे.


६). लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असले पाहिजे.


७). लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रूपये १ लाख पेक्षा जास्त नसावी.


ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे राहतील:

१). कुटुंबप्रमुखांच्या उत्पन्नाचा जो आहे तो दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख रुपायांपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील,

२). लाभार्थीचा जन्माचा दाखला,

३). लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील),

४). वडिलांचे आधार कार्ड, व बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचा छायांकित प्रत आवश्यक आहे,

५). पिवळे अथवा केशरी राशन कार्ड साक्षांकित प्रत,

६). मतदानाचे ओळखपत्र.

७). शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्या नंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला आवश्यक आहे.

८). संबंधित टप्प्या वरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्या बाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied) आवश्यक आहे,

९). कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र.

              ("अ" येथील अटी शर्ती मधील क्रमांक 2 येथील अटी नुसार).

१०). अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे.

११). अविवाहित असल्या बाबत लाभार्थीचे स्वयं घोषणा पत्र आवश्यक.

'लेक लाडकी' ह्या योजनेचा लाभार्थीची ग्रामीण भागात पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी शेविका, सबंधित पर्यवेक्षिका, तर ग्रामीण भागात मुख्या सेविका यांची राहील.

राज्य शासन निर्णय :-

           माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक १ एप्रिल, 2023 रोजी मुलीच्या जन्मा नंतर तिच्या सक्षमीकरणा साठी "लेक लाडकी" ही योजना सुरू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे.


ह्या योजनेअंतर्गत "लेक लाडकी" योजना बद्दल पुढील सर्व माहिती लेक लाडकी या लिंक वर क्लिक करून वाचू शकता.



WhatsApp New Update

PM विश्वकर्मा योजना सर्व माहिती

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने