PM विश्वकर्मा योजना सर्व माहिती | PM Vishwakarma Yojana काय आहे | Deehindavi

 

PM-विश्वकर्मा-योजना-सर्व-माहिती-PM-Vishwakarma-Yojana-काय-आहे-Deehindavi
PM विश्वकर्मा योजना सर्व माहिती | PM Vishwakarma Yojana काय आहे

PM Vishwakarma Yojana काय आहे.

पीएम विश्वकर्मा

PM Vishwakarma Yojana ही भारत सरकारची एक नवीन योजना आहे. त्याचा उद्देश पारंपारिक शिल्पकार, आणि कारागीरंना सशक्त करणे आहे. या योजनेअंतर्गत शिल्पकारांना कौशल्य विकास प्रशिक्षण, ऋण सहायता, उपकरण किट अनुदान, डिजिटल लेनदेनसाठी प्रोत्साहन आणि विपणन सहायता प्रदान केली जाते. आता ही योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे.

पीएम विश्वकर्मा :-  ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर त्या बरोबर कौशल्य प्रशिक्षणही देखील मिळणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारखी पारांपारिक कौशल्ये असलेल्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा आता लाभ मिळणार आहे. त्या मध्ये 1 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज आणि १५ हजार रुपयांपर्यंत साहित्य किंवा तेवढी रक्कम पण दिली जाणार आहे.

योजनेची उद्दिष्टे:

PM विश्वकर्मा ही एक नवीन आलेली योजना आहे. आणि पारांपारिक कारागीर आणि गवंडी यांना त्यांची परंपरागत उत्पादने आणि सेवा वाढवण्यासाठी सुरवाती पासून शेवटपर्यंत सर्वांगीण सहाय्य प्रदान करण्याची योजना आहे. ह्या योजनेचे उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

  • 1. कारागीर आणि गवंडी यांची विश्वकर्मा म्हणून ओळख निर्माण करणे व त्यांना योजनेतील सर्व लाभ मिळण्यासाठी पात्र बनवणे.
  • 2. कौशल्ये सुधारण्यासाठी कौशल्य सुधारणे आणि त्यांना संबंधित व योग्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देणे.
  • 3. त्यांची क्षमता, उत्पादकता व उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्यासाठी चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी समर्थन प्रदान करणे.
  • 4. अभिप्रेत लाभार्थ्यांना संपाश्र्विक मुक्त क्रेडिटसाठी सुलभ प्रवेश प्रदान करणे आणि व्याज सवलत देऊन क्रेडिटची किंमत कमी करणे.
  • 5. या विश्वकर्मांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी व डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे.
  • 6. वाढीच्या नवीन संधींमध्ये त्यांना मदत करण्यासाठी प्लॅटफॉर्म लिंकेज प्रदान करणे.

PM विश्वकर्मा योजना सुरू केली

PM विश्वकर्मा योजनेची सुरुवात दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यामार्फात सुरू करण्यात आली आहे. इच्छुक कामगारांना आपल्या व्यवसायासाठी ऑनलाईन अर्ज भरून कर्ज मिळवता येणार. तुम्हाला ऑनलाईन घरी बसल्या तुमच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन अर्ज करता येतो त्या साठी तुम्हाला खाली दिलेल्या ऑनलाईन अर्जाची वेबसाईट व त्या साठी काय लागतं ही माहिती खाली व्यवस्थित दिलेली आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना लाभ कोणाला मिळणार? (Benefits)
सुतार
नाविक
लोहार
कुलुपांचे कारागीर
सोनार
कुंभार
लोहार
मूर्तिकार
मोची
टेलर
धोबी
मच्छीमार
हातोडा इत्यादी कीट बनविणारे कारागीर
चटई, झाडू बनविणारे कारागीर
लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर
वारीक म्हणजेच सलूनमध्ये काम करणारे कारागीर

PM विश्वकर्मा योजना कागदपत्रे (Documents)
आधार कार्ड
पॅन कार्ड
मोबाईल क्रमांक
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो
जातीचा दाखला
बँक पासबुक


Eligibility Criteria

1. स्वयंरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात, हात आणि साधनांसह काम करणारा आणि योजनेत नमूद केलेल्या 18 कुटुंब-आधारित पारंपारिक व्यवसायांपैकी एक कारागीर किवा कारागीर, PM विश्वकर्मा अंतर्गत नोंदणीसाठी पात्र असेल.

2. नोंदणीच्या दिवशी लाभार्थीचे किमान वय 18 वर्षे असावे.

3. लाभार्थ्यांने मागील कमीतकमी 5 वर्षांमध्ये समान क्रेडिट-आधारित/व्यवसाय विकास, उदाहरणार्थ PMEGP, PM SVANidhi Mudra अंतर्गत कर्ज घेतलेले नसावे.

4. या योजनेअंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका सदास्यापुरते मर्यादित असतील. योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, पती, पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश असलेले 'कुटुंब' असे परिभाषित केलेले आहे.

5. या सरकारी सेवेत असलेली कुटुंबीय योजनेअंतर्गत पात्र असणार नाही.

योजनेचे फायदे

1. ओळख प्रमाणपत्र आणि ओळखपत्राव्दारे विश्वकर्मा ओळख राहील.

2. कौशल्य:

a. कौशल्य पडताळणी नंतर 5-7 दिवस (40 तास) मूलभूत प्रशिक्षण

b. इच्छुक उमेदवार 15 दिवसात  (120 तास) प्रगत प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करू शकतात.

c. Training Stipend: Rs 500 per day

3. टूलकिट प्रोत्साहन: रु 15,000 अनुदान.

4. क्रेडिट सपोर्ट:

a. संपार्श्विक मुक्त एंटरप्राइझ व डेव्हलपमेंट कर्ज: रुपये 1 लाख (18 महिन्यांच्या परतफेडीसाठी पहिला टप्पा) आणि 2 लाख (30 महिन्यांच्या परतफेडीसाठी दुसरा टप्पा)

b. व्याजाचा सवलतीचा दर: MoMSME द्वारे 8% व्याज सबव्हेंशन कॅपसह लाभार्थीकडून 5% आकारले जातील.

c. क्रेडिट गॅरंटी फी Gol ने भरावी.

5.या डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन जास्तीत जास्त 100 व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 1 रुपये (मासिक)

6. मार्केटिंग सपोर्ट: नॅशनल कमिटी फॉर मार्केटिंग (NCM) गुणवत्ता प्रमाणन, ब्रँडिंग आणि प्रमोशन, ई-कॉमर्स लिंकेज, ट्रेड फेअर्स जाहिरात, प्रसिद्धी आणि इतर विपणन क्रियाकलाप यासारख्या सेवा प्रदान करेल.

योजनेसाठी अर्ज कसा करावा

PM विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. त्यासाठी लाभार्थ्याला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर, लाभार्थी योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकता.

विश्वकर्मा योजना महाराष्ट्र

PM विश्वकर्मा श्रम सन्मान योजना देशातील इतर राज्यासह महाराष्ट्र राज्यासाठीसुध्दा लागू असेल; कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला विश्वकर्मा समाजातील कारागीर आढळून येतात...!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने