नवरात्र उत्सव - समारोपीय लेख | घटस्थापना माहिती | Deehindavi.in

 

नवरात्र उत्सव - समारोपीय लेख | घटस्थापना माहिती मराठी | Deehindavi.in
नवरात्र उत्सव - समारोपीय लेख | घटस्थापना माहिती | Deehindavi.in

नवरात्र उत्सव - समारोपीय लेख | घटस्थापना माहिती


आत्याबाई

माझ्या परिचयात एक आत्याबाई आहेत. बहुतांश लोकं त्यांना याच नवाने ओळतात. जास्त बोलण्याच्या सवयीतून, इतरांच्या सुखदुःखाच्या चौकशा करण्यातून, सल्ले देण्यातून त्यांच्याकडे जास्त माहिती, ज्ञान जमा व्हायला लागल्याने त्या छोट्यामोठ्या समस्यांची सोडवणूक बसल्या बसल्या करु लागल्या. आणि त्यामूळे आपल्या गावगाड्यात, पंचक्रोशीत त्या लोकप्रिय बनल्या आहे.

यातून ग्रामीण भागातील अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येत असत होते.

यातून ग्रामीण भागातील अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येत जात होते. अनेकांच्या कुटूंबातील अडी-अडचणी सोडवण्यात आत्याबाईचा एक विशेष आसा हतकंडा आहे. त्यात त्या तरबेज आहेत. न्याय करताना त्या निरपेक्ष न्याय करतात. जवळजवळ त्यांचा न्यायनिवाडा दोन्ही पक्षाला मान्य होतो. या सर्व पायपीटीतून हळूहळू त्यांचे नेतृत्वगुण विकसीत झाले आहेत. कुटूंबातील कारभारात त्या प्रमुख बनल्यामुळे घरालाही पुढे नेण्यात त्यांचा मुख्य रोल होता.

त्या फार शिक्षीत नाहीत.

त्या फार शिक्षीत नाहीत. मोबाईल नंबर कागदावर लिहुन, झाडांच्या, मंदिरांच्या खानाखुणांच्या आधारे गल्ल्या कॉलण्यांचे पत्ते त्या लक्षात ठेवत होत्या. लांबलचक नावे असलेल्या नगरांची कॉलण्यांची नावेही त्यांना उच्चारता येत नाहीत. त्यांना चळवळ माहीत नाही. त्यांन जात्यंतक आंदोलनही माहित नाही.त्यांना पाश्चिमात्य स्त्रीवादही माहिती नाही.त्यांना समाजातील युरोपीयन वर्गीय मॉडेल माहिती नाही की, मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद माहिती नाही. तरी त्या ग्रामीण भागातील सरंजामशाहीतले जात्यांतर्गत द्वंद्व सोडवत होत्या. पितृसत्ताक वर्चस्ववादाला, त्याच्या हुकूमाला वेळोवेळी पायदळी तुडवत जात होते. त्यांचा एक अनुभव आहे. अनुभवातून तयार झाला असा एक त्यांचा कयास आहे. त्या कमालीच्या व्यवहारीक आहेत.   

त्या काही दिसायला नर्मदा बचाव वाल्या मेधाताईसारख्या नाहीत;

त्या काही दिसायला नर्मदा बचाव वाल्या मेधाताईसारख्या नाहीत; बांगड्या घालयच्या की नाही, कुंकु लावायचे की नाही, या भानगडीत आडकुन पडलेल्या आदर्श स्त्रीवादीही नाहीत. काबाडकष्ट करुन गावगाड्यातील चार दोन कुटुंबियांना माणुसकीचा, प्रगतीचा रस्ता दाखवणाऱ्या त्या आहेत. आणि आडल्या नडल्यांना मदत करणे, दुबळ्याच्या पाठीशी उभे रहाणे, खचलेल्यांना परंपरागत कुलदैवताची, दंतकथातील उदाहरणे देवून धीर देणाऱ्या त्या एक बेस्ट काऊंसलर होत्या. उत्तम मार्गदर्शक आहेत. सल्लागार आहेत.

धाडसी स्वभाव,

धाडसी स्वभाव, बहुतेक जगरहाटी फेस केल्यामुळे बनला. त्या कोणत्याही भांडणात उतरल्यामूळे स्वभाव असा बनला असावा. गावातील सरपंचाच्या घरी जाण्यापासून ते कलेक्टर, व तहशीलदार ते एसपी ऑफीस पर्यंत जाण्याची तयारी ठेवणाऱ्या. प्रचंड सकारात्मक उर्जा बाळगणाऱ्या, प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या, त्या आत्याबाई आहेत.

गावखेड्यातल्या आत्या, नानी, खाला, दासी

या आत्याबाई केवळ माझ्याच गावात आहेत का ? नाही, अशा आत्याबाई प्रत्येक गावात,शहरात, पंचक्रोशीत आहेत.ग्रामीण भागात आशा अनेक अत्याबाई , नानी , खाला , दादी , आक्का , भाबी या नावाने परिचित आहेत. त्या गावगाड्याले जाती-जातीतले भांडणे असो, घरा-घरातल्या कौटुंबिक अडचणी असो, नवरा-बायकोचा वाद असो त्या सोडवतात. न्यायाच्या बाबतीत न्यायाधिशापेक्षाही अधिक न्याय देणाऱ्या त्या असतात. त्यामूळेच लोक त्यांना मान देतात , दबतात , त्यांचा शब्द लोक पाळतात. त्यांच्या प्रति आदराची भावना ठेवतात.

त्या भर रस्त्यावर कुनालाही रागावून बोलु शकतात.

गावोगावी असणाऱ्या या आत्याबाईवजा महिलांचा संपूर्ण गावात एक विशेष प्रभाव असतो. त्या भर रस्त्यावर कुनालाही रागावून बोलु शकतात , कितीही मोठा असु द्या त्याला त्या सरळ करु शकतात. गावगाड्यातील ह्या बेस्ट सोशल वर्कर आहेत. सासुरवाशीण सुनांसाठी त्या मुक्तीदात्या असतात. शोषण-पीडनाचे सर्व स्तर त्या आपल्या कुवतीनुसार नाकारत होत्या. गावात कुणी अन्याय करत असेल तर ते त्याच्या तोंडावर त्याला बोलतात. एखाद्या गरीबाची, बाहेरून आलेल्या संन्याशाची, भटके मुक्ताची कुणी टिंगल टवाळी करत असेल रस्त्याला कोणी डिवचत असेल तर अशा आत्याबाई पुढाकार घेऊन समोरच्या गुंडांना टाग्यांना पळवून लावतात. सैराट चित्रपटात आर्ची परशा ला आधार देणारी आत्याबाई तुम्हाला आठवतच असेल. असो अशा आत्याबाई सर्वत्र आहेत.

मध्ययुगीन भारतात संत जनाबाई आशाच एक आत्याबाईच आहेत.

त्यांनी डोईचा पदर कंबरेला खोसुन, भर बाजारात येवून प्रबोधनासाठी आणि हातात टाळ विना घेतला होता. कुनी आगावची बाई म्हनेल म्हणून त्यांनी आधीच घोषणा केली होती, की कुनाला मनगटावर तेल घालून काय बोंबलायचे आहे तर बोंबला मला काही फरक पडत नाही.तुम्ही फारच टिका करणार असाल तर मीच घोषणा करते की मी विठ्ठलाचे घर निघायला तयार आहे. त्याची वेश्या होइल. हा समर्पणभाव आहे. कशासाठी ओ ? समाजसुधारण्यासाठीच ना! 

काॅ. शरद पाटील यांनी अशा बायकांची ऐतिहासिक परंपरा इतिहासाच्या गर्भातून शोधून काढली आहे. सिंधुकाळात मातृसत्ताक व स्त्रिसत्ताक समाजाचा ते उल्लेख करतात. त्यामध्ये एक कुलामधून दूसऱ्या मुलामध्ये औषधोपचार व मातृसत्तेच्या धर्माचे प्रबोधन करणाऱ्या अशाच आत्याबाईंना त्यांनी शोधले. त्यांना कुल-टा म्हणतात. जो शब्द नंतर पुरुषसत्ताक समाजात बदनाम केला गेला आहे.

आत्याबाई या चालतबोलत न्यायालय आणि त्याची परंपरा मातृसत्तेतून अशी येते. हे कुण्या सामाजिक चळवळीच्या गावीही नाही. हे कुण्या आजच्या लेखक साहित्यिकांच्या दृष्टीसही पडले नाही. आश्चर्य आहे.

नवरात्र उत्सवामध्ये अशा धाडसी आत्याबाईंना बोलावून त्यांचा सन्मान केला पाहिजे.

नवरात्र उत्सवामध्ये अशा धाडसी आत्याबाईंना बोलावून त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना साडीचोळी देऊन त्यांची ओटी भरून त्यांच्या पायावर मनापासून नतमस्तक झालं पाहिजे. ह्याच आजच्या निऋती,दुर्गा महाकाली, रेणुका, अंबाबाई सप्तश्रुंगी, तुळजा आहेत. ह्या प्रत्येक गाव खेड्यातल्या धाडसी आत्याबाई जिजाऊ अहिल्यामाई, ताराराणी, सावित्रीमाई, रमाई, भिमाई,आहेत.

त्यांना आधार देऊन त्यांचा संसार नीट मार्गाला लावून दिला.

यांनीच प्रत्येक गाव खेड्यामध्ये अनेक सुनांची बाजू घेऊन, त्यांना आधार देऊन त्यांचा संसार नीट मार्गाला लावून दिला. अनेकांना औषधी जडीबुटी अव्हेलेबल करून दिली. अडल्या नडलेल्या बायांचे बाळंतपण करून दिले. आत्महत्येचा विचार करत असणाऱ्या शेतकऱ्यांकडे जाऊन काउंसलिंग करून हेही दिवस जातील याचा धाडस दिलं.

आपणही अशा हजार एक आत्याबाईंचा मेळावा घेऊन त्यांना बोलते कले पाहिजे.

आपणही अशा हजार एक आत्याबाईंचा मेळावा घेऊन त्यांना बोलते कले पाहिजे . त्यांच्या अनुभवाचे डाक्यूमेंटेशन कले पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा प्रसार होण्यासाठी त्यावर ग्रंथ निर्माण केले पाहिजे . त्यांना नवीन कायद्यांचे ज्ञान दिले पाहिजे. आत्याबाई संस्था गावगाड्यात भक्कम करण्याचा हा छोटा प्रयत्न केला तर बऱ्याच समास्य नक्कीच सुटतील.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अशा सगळ्या आत्याबाईंना आमचा मनापासून दंडवत. नवरात्र उत्सवात चालत असलेली ही एकूण लेखमाला आज या आत्याबाईंना नमस्कार, प्रणाम करून संपन्न करत आहोत.


धन्यवाद.




लेखक
नितीन सावंत परभणीकर
मो : 9970744142



घटस्थापनेचा पहिला दिवस - सिता जन्मोत्सव | भाग 1

नवरात्र उत्सव रात्र दुसरी कौल देनारी आंबाबाई | भाग 2

नवरात्रोत्सव रात्र तिसरी - हिंगुळजा भाग 3

नवरात्रोत्सव रात्र चौथी तेरणा मांजरेची गणमुख्या - कुलस्वामिनी तुळजाभवानी भाग 4

नवरात्रोत्सव रात्र पाचवी आईचे हृदय - माहुर भाग 5

नवरात्रोत्सव रात्र सहावी - हारितीचे स्त्रीराज्य भाग 6

नवरात्र उत्सव रात्र सातवी वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली भाग 7

नवरात्र उत्सव - रात्र आठवी - आंबा जोगाई भाग 8

नवरात्रउत्सव रात्र नववी - घरातील टाक आणि जानाई निर्ऋतिचा अनुबंध भाग 9

नवरात्र उत्सवाच्या संदर्भातील भूमिका


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने