नवरात्र उत्सवाच्या संदर्भातील भूमिका | घटस्थापना माहिती मराठी | Deehindavi.in

 

नवरात्र-उत्सवाच्या-संदर्भातील-भूमिका-घटस्थापना-माहिती-मराठी-Deehindavi.in
नवरात्र उत्सवाच्या संदर्भातील भूमिका | घटस्थापना माहिती मराठी | Deehindavi.in

नवरात्र उत्सवाच्या संदर्भातील भूमिका | घटस्थापना माहिती मराठी

भारतात उभारलेल्या प्रागतिक चळवळीमध्ये चिकित्सेची, अन्वेषणाची, टोकदार नकाराची, टोकाचे तर्क उपस्थित करण्याची जी पाश्चिमात्य धारणे वरली इंग्रजांच्या धाटणीची अन्वेषण पद्धती सुरू झाली त्यातून भारतीय सभ्यतेचा फार मोठा ठेवा अभ्यासाच्या कार्यक्षेत्रात आलाच नाही. महाबलाढ्य असणाऱ्या शेतकरी जातींचे सण-वार, उत्सव यात्रा, लोकपरंपरा ह्या पुरोगामी, विज्ञानवादी, फुले शाहू आंबेडकरवादी,  प्रागतिक चळवळींनी मनापासून अभ्यासल्याच नाहीत. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील बहुसंख्य वर्गाच्या मनाची पकड घेणाऱ्या सभ्यतेला, अब्राह्मणी परंपरेला आज घडीला पुन्हा एकदा अभ्यासाच्या क्षेत्रात आणावे लागत आहे.

देशात पुरोगामी वर्गाची हेळसांड झालेली आहे.

सिंधू सभ्यतेतुन चालत आलेले सणवार उत्सव टिकवून ठेवण्यासाठी चाललेली सर्वहरा वर्गाची धडपड आणि पुरोगाम्यांची नकारात्मक नास्तिकवादी मांडणी यात नेहमी फायदा झाला तो ब्राम्हणी प्रतिगामी छावणीला. भारतीय पुरोगामी वर्गात इंग्रजांच्या पाश्चात्त्य चिकित्सक वृत्तीने नकारात्मक नास्तिकवादाचे बेफाम पीक आल्यामुळे या देशात पुरोगामी वर्गाची हेळसांड झालेली आहे.भारतीय पुरोगाम्यांनी इंग्रजांच्या प्रमाणेच या देशातील जुण्या सभ्यतेला( कल्चर ऐवजी सभ्यता) हिडीसफिडीपने हिन लेखायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात पुरोगामी चळवळी दीर्घकाळ टिकु शकल्या नाहीत.  

त्यासाठी तो कर्जबाजारी होनेही स्विकारतो.

एवढेच काय हे जुने सणवार उत्सव इतके भेदक आणि सर्वहरांची नेनीव क्याच केलेले आहेत की त्या सणवार उत्सवाच्या दिवसी तुम्ही सर्वहरांच्या हिताचा एखादा प्रोग्राम ठेवा. त्यांना फायदा मिळवून देनारी एखादी मिटिंग ठेवा. सर्वहरा वर्ग म्हनतो आम्हाला येता येनार नाही, त्यादिवशी आमचा सण आहे. सण,उत्सव टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कष्टकरी,वंचित, शोषीत वर्ग कुठलीही किंमत मोजायला तयार असतो.त्यासाठी तो कर्जबाजारी होनेही स्विकारतो.काही पुरोगामी सुद्धा ते सणवार साजरे करत नसतील मात्र त्या दिवसी गोडधोड तरी करतात.म्हणजे त्यांचा देखील त्या दिवशी त्या सभ्यतेप्रती असलेला आत्मभाव प्रगट झाल्याशिवाय राहात नाही.

त्यासाठी आपल्याला विधायक प्रबोधन हाती घ्यावी लागणार आहे.

कालबाह्य झालेले सणवार,उत्सव,परंपरा यातून आपल्याला जनतेला बाहेर तर काढायचेच आहे, त्यासाठी आपल्याला विधायक प्रबोधन हाती घ्यावी लागणार आहे.यामुळे अगोदर त्या सणवार उत्सवांमध्ये गेलं पाहिजे,मिसळलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे,  त्यानंतर त्याची विधायक मांडणी करून लोकांमध्ये आपल्याला सत्य आणि हाती लागलेलं तथ्य घेऊन जायचं आहे. यातून आपन बाहेर फेकले जाणार नाहीत.आपली हार होनार नाही .आणि संस्कृतीचे ठेकेदार सत्ताधीश होनार नाहीत याची काळजी घ्यायची आहे.

यावर उपाय काय ?

  1. भारतीय चिकित्सक वृतीने त्या सणवार उत्सवांची विधायक मांडणी करण्याची जबाबदारी आपन उचलली पाहिजे.प्रबोधन करावे पण विधायक.
  2. जसे की हे सणवार उत्सव कसे निर्माण झाले?कसे विकास पावले? त्यावेळी लोकांच्या मेंदूंची अकलनक्षमता काय होती ? वगैरे. 
  3. त्या सणवार उत्सवाने काय काय नवनिर्माण केले ? नवनिर्मीतीस काय  हातभार लावला ? लोकांच्या वेदना पिडन दुर करण्यास त्या सण उत्सवांचे योगदान काय ? आज त्याची उपयोगीता किती ? कुठला भाग नाकारावा? वगैरे 

यासाठी आपण लोकदैवतांच्या विश्वात, त्या कालखंडावर लक्ष केंद्रित करत आहोत. प्राचीन मातृदैवतांच्या नावाने सुरू असलेला नवरात्र उत्सव आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी असणाऱ्या लोकदैवता याला आपण अभ्यासाच्या, चर्चेच्या कार्यक्षेत्रात आणत आहोत. यासाठी कॉ शरद पाटील यांच्या काही अन्वेषण पद्धतीचा वापर करत आहोत.

१) अब्राम्हणी बहुप्रवाही विधायक ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पध्दती आणि

२) जाणीव नेनीवेचे तर्कशास्त्र.

ग्रामसंस्कृतीला संजीवनी पुरवनारे लोकलावंत :

आपला भारतीय कुठलाही लोककलावंत घ्या, मग तो पिंगळा असो नाहीतर वासुदेव असो,गोंधळी असो नाहीतर राइंदर असो.नवनाथाच्या वेषातील नाथ जोगी, डवरी गोसावी असो नाहीतर जोषी असो, हा लोककलावंत जे काही सांगतो ते इहलोकीचे जीवन सुखसंपन्न होइल , भरभराट होइल याबद्दलचा तुमचा आशावाद वाढवतो.पॉझिटीव्हनेस सांगतो.अनेक खचलेल्या, हारलेल्या शेतकरी , कष्टकरी , श्रमीकाला हे कलावंत मोटिव्हेशन पुरवतात.

यंदा सुगी लै हुइल , घरात पाळणा हलेल , लेकीचं लगिन होइल , घरातले आजार कमी होतील , दु:ख दारिद्र्य घरतील दैना जाइल  , यंदा वारि घडेल वगैरे. तसे हे कालावंत एकेकाळीचे दुरदर्शनच.रोगराई होइल , साथीचा रोग आलाय काळजी घ्या , कुठल्या भागात चांगली सुगी आलीय , कुणाचे पोर लग्नाला आलेय असे अनेक सांगावे सांगनारे हे कलावंत होते.

यांच्या कलाप्रकाराने ग्रामीण भागाला नवसंजीवनी पुरवीली गेली होती .हजारो वर्षे ग्रामीण भाग यांच्याकडून जगण्याचा प्रेरणेचा जीवनरस घेत आला आहे.यांच्याच सांस्कृतिक संचितामुळे कधीही शेतकरी वर्गाने आत्महत्या केलेलेल्या नाहीत.हेही दिवस जातील हा संदेश ही कलावंत मंडळी देत असे.

यांचे ठोकताळे आणि अंदाजही प्रचंड पर्फेक्ट असत . आजचे तुमचे वैज्ञानिक हावामान खाते हजारो वेळा दरवर्षी चुकते.आमच्या ग्राम संस्कृतीचे हे दुत कधी चुकत नसत. यांनी इहलोकीचे जीवन सुखकरच बनवले होते .उत्पादन वाढवले होते. 

याउलट ब्राम्हणांनी लालूच दाखवली ती मृत्यूनंतरच्या जीवनाची.स्वर्ग मिळेल , मोक्ष मिळेल किंवा पुनर्जन्म चांगला मिळेल वैगरे. त्याचबरोबर आम्हाला दान नाही दिले तर नर्कात जाल , पाप करु नका , वगैरे.परंतू लोककावंतांनी मात्र कधीही भिती घातलेली नाही.

आज घडीला त्या लोककलावंतांच्या प्रती आदराच्या भावनेतून उतराई होण्याची वेळ आली असताना, त्यांची टिंगल करणे , ते कसे विज्ञानवादी नाहीत, यडे आहेत हे दाखवने म्हणजे खाल्लेल्या ताटात हागणे होय.तुमच्या माय बापाला यांनीच निराश होऊ दिलेले नव्हते.त्याचे उपकार आपण या कलावंतांची टिंगल करुन त्यांना हिन लेखून फेडनार आहात का ?

पाश्चिमात्य विज्ञानाच्या जोरावर एवढ्या उड्या मारनार का ? बरे ही वैज्ञानिक कमाई तुमचीही नव्हे.

ग्रामीण भागात आज सांस्कृतिक संचित आटल्यामुळेच आत्महत्या वाढलेल्या आहेत.रात्रभर चालनारे गोंधळ बंद झाल्याने , बहुरूपी करमणूक करण्यासाठी गावी येने बंद झाल्यामुळे , सोंगे घेनारे , भरुडकार, मोर पंखाची पेंढी पाठीवर, डोक्यावर मारून दोम दोम म्हणत धैर्य देणारे सुफी फकीर वगैरे आज कमी झाल्यामुळे आपण परात्मतेची राख  स्वताला फासुन घेत आहोत.

याद्वारे एकूण लोकपरंपरेचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आहे. यात मांडलेली मते अंतिम नाहीत. केवळ लोकांना त्या कालखंडावर नेऊन विधायक चिकित्सा सुरु करता आली तरी आम्ही धन्यता पावलो. असे मी समजतो.


धन्यवाद.





लेखक
नितीन सावंत परभणीकर
मो : 9970744142



घटस्थापनेचा पहिला दिवस - सिता जन्मोत्सव | भाग 1

नवरात्र उत्सव रात्र दुसरी कौल देनारी आंबाबाई | भाग 2

नवरात्रोत्सव रात्र तिसरी - हिंगुळजा भाग 3

नवरात्रोत्सव रात्र चौथी तेरणा मांजरेची गणमुख्या - कुलस्वामिनी तुळजाभवानी भाग 4

नवरात्रोत्सव रात्र पाचवी आईचे हृदय - माहुर भाग 5

 नवरात्रोत्सव रात्र सहावी - हारितीचे स्त्रीराज्य भाग 6

नवरात्र उत्सव रात्र सातवी वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली भाग 7

नवरात्र उत्सव - रात्र आठवी - आंबा जोगाई भाग 8

नवरात्रउत्सव रात्र नववी - घरातील टाक आणि जानाई निर्ऋतिचा अनुबंध भाग 9





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने