नवरात्र उत्सव रात्र दुसरी कौल देनारी आंबाबाई | भाग २ | Deehindavi.in

 

नवरात्र-उत्सव-रात्र-दुसरी-कौल-देनारी-आंबाबाई-Deehindavi.in
नवरात्र उत्सव रात्र दुसरी कौल देनारी आंबाबाई | Deehindavi.in

नवरात्र उत्सव रात्र दुसरी कौल देनारी आंबाबाई

अखंड ज्योत तेवते , तुझ्या निरांजणातली l
आपार भावभक्तीने तुझीच मुर्त पुजीली ll
त्रिशूळ खडग घेवुनी, विनाशन्या असुर ये l
बनुनी रौद्रकामीनी प्रकाशन्या तिमीर ये ll

शाक्त अर्थात स्त्रीवादी परंपरेतील एकूण 108 शक्ती पिठांपैकी प्रमुख चार शक्तीपीठे महाराष्ट्रातील आहेत.चार आकडा सम सख्येत येतो. विषमतावाद्यांना समता नको म्हणून त्यांनी साडेतिन शक्तीपीठे हे विषमतावादी नामकरण रुढ केले.आर्धपिठ असे काही नसतेच मुळी. प्रत्येकीचे एक स्वतंत्र आधिष्ठान आणि एक स्वतंत्र गणराज्य होते.त्यात कुनीही आर्धे नाही.म्हणून चार शक्तिपीठे.जे लोकं सव्वा रुपाया, अकरा रुपये, एकवीस रुपये, एक्कवन्न रुपये, एकशे एक रुपया असला विषय अंकात दक्षिणा घेतात.त्यांनी हे साडेतिन शक्तीपीठे नामकरण केले आहे.आपण चार शक्तिपीठेच म्हणावेत.  

या प्रमुख चार शक्तींनी महाराष्ट्र उभा केला. मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक परंपरेतील वंशसमाजातील या चौघींनी विविध प्रकारच्या शेतीपद्धतीचे प्रयोग करुन आपला गण जगवला.पोसला,जपला,वाढवला.या चौघींचीच लेकरे आपण.शेतीचा सण घटस्थापना असल्याने त्यांचे नित्य स्मरण नवरात्रोत्सवात शेतकरी कष्टकरी वर्गाने करणे साहजिकच आहे.


त्या चौघी खालीलप्रमाणे.

१) तुळजेने तेरणा मांजरेच्या सुपीक गाळात भातशेती केली. तिची ही शेती गाळाच्या खोऱ्यातली. खोलगट भागातील.तिचे टोटम कदंब वृक्ष.


२) रेणुकेचा गण सरकती शेती करणारा. शेतीसाठी सुपीक जमीन शोधुन, तेथील उतारावर काही काळ शेती करुन पुन्हा पुढे सरकणारा तो गण.डोंगराच्या उतारावर आजही बऱ्याच राज्यांत शेती केली जाते.


३) सप्तशृंगी : उंच डोंगर माथ्यावर कमी पाण्यावर शेती यशस्वी करुन दाखवलेली राज्ञी सप्तशृंगी आहे.सात डोंगरांचा मुकुट धारण केलेली ती सप्तशृंगी.


४) 
आंबाबाई : अत्यंत दलदलीच्या भागात , जलमय प्रदेशातही शेती यशस्वी करुन दाखवून आपला गण जगवणारी , पोसणारी, टिकवणारी नाही तो वाढवनारी आंबाबाई आहे. फळे भाज्यांचा शोध या गणाने लावला होता.

यापैकी आपण कोल्हापूरच्या आंबाबाई बद्दल पाहुया.

कौल देनारी ती अंबाबाई :

अंब म्हणजे जल, जसे पंजाब हा पाच नद्यांचा प्रदेश आहे .अगदी त्याचप्रमाणे पंचगंगेच्या जलमय आणि दलदलीच्या भागात शेती यशस्वी करुन दाखवणारी अंबा ( त्याचा अर्थ आई ) म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई आहे. त्या काळात लेकरे जगवणे, गणवृद्धी करणे हे काम जिकरीचे होते.आशाकाळात तिने किंवा तिच्या ज्ञातीने विविध भाज्यांचा शोध लावला आहे. तशी शेती विकसीत केली. आणि त्यातून आपला गण जगवला आणि वाढवला.म्हणून कोल्हापुरात शांकभरी ही भाज्यांच्या देवीचे सुद्धा ठाणे आहे. महाराष्ट्रभर अनेक भाज्यांची मिळुन मिक्स भाजी करण्याचा जो प्रकार आहे.तो या गणातून आलेला.मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसी भोगीला ही भाजी केली जाते. आलेल्या सुबत्तेचा भोग घेनारी ती भोगी, आपल्या गणातील विविध सदस्यांनी पिकवलेल्या विविध भाज्यांची सामूहिक एकत्रित शिजवून भाजी बनवण्याचा तो उत्सव भोगीचा.शाक हे या मिक्स भाजीसाठीचे नाव सांगली जिल्ह्यात वापरतात.

आंबा हे पद आहे. त्या पदावर विविध राज्ञी होऊन गेलेल्या आहेत. त्रिपुरसुंदरी ही त्या अनेक आंबांपैकी एक होय.कोल्हापूरच्या सर्व लोकप्रकारांत रिवाज आणि परंपरात हा इतिहास आजही दफन आहे.तो आपण पुढे आणला पाहिजे. कोल्हापूरत आनेक राज्ञी विविध ठिकाणी ठाण मांडुन बसलेल्या आहेत. गारगोटी रोडला कातळ दगडाच्या कपारीत कात्यायनी आहे. तर कोल्हापूर शहरासह कोल्हापूरच्या सिमेपर्यंत तिच्या विविध ज्ञातींची ठाणे आहे.ज्यामध्ये त्र्यैंबोली,विठलाई देवी, मायक्का देवी (कोल्हापूर बॉर्डर), टेंबलाई देवी, भवानी देवी (किल्ले पन्हाळा), काळम्मा देवी, (महाकाली मंदिर), थिरंगाई देवी, कमळजादेवी, पदमावती, निनाई ( शाहूवाडी ), अनुकामीनीका देवी ,जोमकाई देवी, यमाई देवी ( ज्योतिबा पायथा ),भावेश्वरी देवी,हुलकाई देवी ( जंगलाची देवी, डोंगराची देवी ),मरगुबाई माता, यल्लूबाई आदी देवींची ठाणे होत. शिवाय अंबेचे संरक्षक म्हणून जी नावे येतात ती रंकभैरव आणि काळभैरव.रंकभैरवाच्या नावे रंकाळा तलाव आहे.

गणात सुबत्ता वाढल्यानंतर तिने न्याय निवाडा देनार्या भुमीका घेवुन, सर्वांना पदराखाली घेऊन आपलेसे केल्याने, देवीचा कौल प्रकार रुढ झाला होता. कौल देने म्हणजे निर्यण देने, न्याय देने, पिकांचे, पावसांचे आदाज व ज्ञान देणे. देवीने कौल दिला की सर्व गण कामाला लागायचे. घरावरच्या छप्पराला कौल काही उगीच म्हनत नाहीत. देवीचा आमच्यावर वरदहस्त आहे.कौल आहे म्हणून तिच्यामुळे मिळालेले हे छप्पर कौलारु घर आहे.

विर-रसाचे सर्वाधिक शब्द आणि गित रचना आंबाबाईच्या बद्दल पहायला मिळतात. उदो उदो म्हणजे तिचा जयजयकार आहे किंवा गुणगाण. तिच्या समोर उद जाळणे, भंडारा उधळणे, दिवटी पेटवने, मळवट भरणे, बेभान होऊन नाचत आनंद व्यक्त करणे ही सुबत्तेची, भरभरून उत्पन्न दिल्याचे लक्षणे आहेत. उदो उदो म्हणजे उत्पादन वाढीची क्रांती. गोंधळ म्हणजे रात्रभर चालणारे पुर्वजांची किर्ती सांगणारे लोककथन आहे. ती एक रात्रीची शाळाच! आज बघा गोंधळ हा शब्द किती विकृत आर्थाने आपण वापरत असतो. कुनी धिंगाणा मस्ती केली की आपण म्हनतो काय गोंधळ घातला. हा विकृत वाक्यप्रयोग कुनी रुढ केला असावा? ज्यांना अंबाबाईचा गोंधळ सांगणारी रात्रीची शाळा डोळ्यात खुपत होती, गोंधळातून लोक हुशार करणे पुर्वजांचे मोठेपण सांगणे आवडत नव्हते आशा ब्राम्हणी परंपरेने आणि पहिल्या टप्प्यातील ब्राम्हणी शिक्षकांनी काय गोंधळ घालताय शब्दप्रयोग रुढ केला आहे.

कोल्हापूरच्या नावातच ती अब्राम्हणी परंपरेची आंबाबाई आहे. ती काही विष्णुची लक्ष्मी नव्हे. ती नारायणी नाही. तिचे ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न सतत चालु असतो पण लोकपरंपरा तिला लक्ष्मी न म्हनता आजही आंबाबाईच म्हणत आहे. सर्वच्या सर्व लोकगितांत ती आंबाबाई आहे. तुळजा रेणुका आणि आंबाबाई ह्या दक्षिण भारतीयांच्या दृविडांच्या सांस्कृतिक वारसा आहे. संबंध महाराष्ट्रच दृविडांचा, दक्षिण भारतीयांचा. पण संस्कृती हरवलेले भटाळलेले लोक, गुलाम बनलेले लोक हे सर्व विसरुन गेले आहे. कोल्हापूर भागातील गावांची नावे, गावोगावच्या लोकपरंपरा यांत हा इतिहास आजही जीवंत आहे. जसे की हिंगोली जिल्ह्यातील चौंढी आणि आंबा दोन्ही गावे जी अगदी एकमेकांना लागुन आहेत, ही गावे कोल्हापूरच्या आंबाबाईच्या गणाच्या वारसदारांनी वसवलेली आहेत.

कोल्हापूरची आंबाबाई ते करविर संस्थापिका महाराणी ताराराणी हा हजारो वर्षाचा मातृसत्ताक स्त्रीसत्ताक परंपरेचा समतेचा वारसा.हे शहरच समतेची भुमी.माणसाला माणूस माननारा प्रगतीशील वारसा कोल्हापूरचा. नवरात्र उत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या सर्व उत्सव व परंपरा नक्की पाहिल्या पाहिजेत.



लेखक
नितीन सावंत परभणीकर
मो : 9970744142





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने