नवरात्र उत्सव - रात्र आठवी - आंबा जोगाई भाग 8 | नवरात्र उत्सव मराठी माहिती | Deehindavi

 

नवरात्र-उत्सव-रात्र-आठवी-आंबा-जोगाई-भाग-8-नवरात्र-उत्सव-मराठी-माहिती-Deehindavi
नवरात्र उत्सव - रात्र आठवी - आंबा जोगाई भाग 8 | नवरात्र उत्सव मराठी माहिती | Deehindavi

नवरात्र उत्सव - रात्र आठवी - आंबा जोगाई भाग 8 | नवरात्र उत्सव मराठी माहिती

आंबेजोगाई हे नैसर्गिक दृष्टीने अत्यंत सुंदर असे बीड जिल्ह्यातील शहर.सांस्कृतिक वारसा असलेले सर्वात जुने शहर आंबेजोगाई आहे.हे शहरावर तसे अनेक राजेमहाराज्यांच्या राजवटीखालुन गेलेले आहे.संत चक्रधर स्वामींचे प्रवचनही येथे झाल्याच्या नोंदी आहेत.या शहरासंदर्भात सर्वात जुना वारसा जोगाईच्या अंबाबाईचा. जयवंती नदीकिनाऱ्यावर वसलेली मातृसत्तेची राज्ञी म्हणजे जोगेश्वरी.मुळात ही एक योगीनी.आंबा आणि जोगीणी (योगीणी) या दोन शब्दांपासून आंबाजोगाई हा शब्द बनला आहे.म्हणजे आंबाजोगाई या शहराच्या नावातच मातृसत्तेचे पुरावे दफन आहेत. भारतात एकूण 64 योगिनी होऊन गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. 64 योगिनी आणि 84 सिद्ध अशी शाक्त व सिद्धांची परंपरा भारतात दीर्घकाळ अस्तित्वात होती. 

मातृसत्ताक आणि स्त्रीसत्ताक  समाज व्यवस्थेच्या काळामध्ये हे एक मोठे नगरच होते.

मातृसत्ताक आणि स्त्रीसत्ताक  समाज व्यवस्थेच्या काळामध्ये हे एक मोठे नगरच होते. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या प्रस्थापनेनंतरच्या काळात अशा मातृसत्ताक ठिकानांचे 'दुष्ट नेनीवेकरण' करण्यात आले होते. म्हणून आंबेजोगाई येथे या योगीनीचे नगर आज घडीला स्मशानभूमीत अडगळीत टाकले आहे. म्हणजे नंतर त्या भागात स्मशानभूमी बनवण्यात आलेली होती. निर्ऋतीही नरकदेवता म्हणून अशीच बदनाम करण्यात आली होती. तिची नैऋत्य दिशा अशुभ मानली गेली होती. तिचा जन्मदिवस अमावस्या, तिचे वहान गाढव आहे, आजही अशुभ मानतात. म्हणून पूर्वीचे आंबेजोगाईचे शहर आजच्या काळात असलेल्या बारा खांबी मंदिर परिसरात होते. अलीकडच्या काळात या भागात सर्व जातीच्या समशानभूमी बनवलेल्या आहे.

नवरात्र-उत्सव-रात्र-आठवी-आंबा-जोगाई-भाग-8-नवरात्र-उत्सव-मराठी-माहिती-Deehindavi


म्हणून ही योगिनी मुख्य आंबाबाई आज स्मशानभूमीत आडगळीत आहे.

म्हणून ही योगिनी मुख्य आंबाबाई आज स्मशानभूमीत आडगळीत आहे.या भागाला बाराखांबी मंदिर परिसर म्हटले जाते.या परिसरात नव्याने काही मंदिरांचे अवशेष मिळाले आहेत.या ठिकाणी मोरावर स्वार असलेली एक योगिनी शिल्प आहे.आणि,कानात गोल रींग असलेली दाढी असनारी एक योगी पुरुषाची मुर्तीही आहे.त्याच्या पायाखाली सुद्धा मोरांची शिल्पे आहेत.

मोर ज्ञातीचिन्ह या आंबा योगीनीचे होते.

म्हणजे मोर ज्ञातीचिन्ह या आंबा योगीनीचे होते. तिच्या गणाचे कुलचिन्ह मोर होते. याबद्दल, अजुन तपशील घेतला असता आंबेजोगाईचे रहिवासी विनोद उंबरे म्हणाले,या भागात मोरांची संख्या खुप आहे.बिड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात नायगावला मयुर अभयारण्य आहे. शिवाय आंबाजोगाईला लागूनच मोरेवाडी नावाचे गाव आहे. यापेक्षा सर्वांत महत्वाचे दोन पुरावे जसे की या भागातील बहुतांश महिला मोरणीची नथ वापरतात. जसे की यरमाळ्याच्या यडेश्वरी देवीला मानणाऱ्या स्त्रीया विशिष्ट प्रकारचे इरकलचे रेषारेषांचे लुकडे परिधान करत असतात. त्याप्रमाणे आंबा जोगाईला मानणाऱ्या स्त्रीया मोरणीची नथ वापरत असतात. दुसरा पुरावा असा की,  काही ठिकाणी परडीसोबत मोरपंख पुजले जातात.

या आधारे आपन योगिनी आंबाबाईचे ज्ञातीचिन्ह मोर आहे हे निश्चित करु शकतो. हे तपशील घेवून निघताना आम्हाला आंबाजोगाई बसस्टॉपला मोरणीची नथ घातलेली महिला भेटली होती.

या बाराखांबी मंदिर परिसरात देवीचे यंत्र सापडले आहेत. ते दगडावर कोरलेले आहेत. यंत्र तंत्र आणि मंत्र ही तांत्रिक त्रयी आहेत. म्हणजे आपल्याला अवगत झालेले तंत्र यंत्राद्वारे मांडले जात होते उदा. जसे की चौपट.

याच स्मशानभूमीच्या परिसरात मुळजोगाई देवीचे मंदिर पण आहे. ही मुळजोगाईच खरी गणमाता आहे. पुढे तिला गावात नेवून तिचे मंदिर बाधण्यात आले होते. या मुळजोगाईला लागून रेणुका माता मंदिर आहे. तिच्या पुढे तिची पुष्करणी आहे. या मुळजोगाईच्या दृष्टीक्षेपात पुढे हे बाराखांबी मंदिर एका बाजुला दासोपंत यांची सामाधी पण आहे. ह्या दासोपंत यांच्या समाधी मागे पुर्वीच्या दोन पुष्करण्या आहे. म्हणजे रेणुकेप्रमाणे या दासोपंत यांच्या परिसरात सुद्धा एक उपदेवता आहेच. तिचे नामोनिषान मिटले आहे. फक्त उरल्यात फक्त दोन पुष्करण्या. या आजूबाजूला असणाऱ्या उपदेवता जोगेश्वरीच्या ज्ञाती असाव्यात. ज्याद्वारे तिचा चौपट निश्चित होइल.

नवरात्र-उत्सव-रात्र-आठवी-आंबा-जोगाई-भाग-8-नवरात्र-उत्सव-मराठी-माहिती-Deehindavi


वंशसमाजात आधी बनतो गण.

वंशसमाजात आधी बनतो गण.त्या गणाची प्रमुख असते गणराज्ञी.गणराज्ञीच्या गणातील लोकसंख्या वाढल्यानंतर तो गण विभक्त होतो. तो बनतो ज्ञातीप्रमुखांचा. म्हणून ही योगेश्वरी ज्ञाती प्रमुख आहे. ज्ञातीचे कुळे बनतात. ही कुळे पुढे नव्या नव्या शेतजमीनीच्या शोधार्थ ज्ञातीच्या गणातून विभक्त होऊन नवे नवे गावे वसवतात. सांगली जिल्ह्यातील उदगाव हे योगेश्वरीच्या गणाचे कुळ होते.हे कुळ आंबेजोगाईच्या गणातून नव्या शेतजमीनीच्या शोधात उदगावच्या भुमीपर्यंत आले.तेथील शेतीयोग्य भुसभुशीत जमीनीत हे कुळ विस्तारले, त्यांनी आपला वंशवेल वाढवला.आपल्या गणप्रमुखाची आठवण म्हणून त्या कुळाने तिथे योगेश्वरीचे ठाणे उभे केले आहेत.आजही दरवर्षी तिथे यात्रा भरत असते. जोगणीचा आगळावेगळा सांस्कृतिक वारसाही त्या गावाने अजुन जपून ठेवलेला आहे. वंशसमाजात जातीव्यवस्था नसल्यामुळे गणराज्ञी, ज्ञाती कुळे हे सर्वांचीच आहे. कुळ एका जाती समाजाची मक्तेदारी नाही. कुलचिन्ह हा प्रकार सर्वच जातींमध्ये दिसून येतो. लग्नाच्या वेळेला, हळदीच्या वेळेला जे देवक पूजलं जातं ते असतं कुलचिन्ह. या कुल चिन्हांच्या आधारे आपण कोणत्या कुळाचे आहोत, कोणत्या ज्ञातीचे आणि कोणत्या गणाचे आहोत इथपर्यंत शोध घेत जाता होते. नंतरच्या काळात जातीव्यवस्था आल्यामुळे अनेक कुळे वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या जातीमध्ये बंदिस्त झालेली आहे. म्हणजे सपिंड, सकुल्य बांधव जाती व्यवस्थेच्या काळात वेगवेगळ्या आणि भिन्न जातींमध्ये बंदिस्त झालेली आहेत. आज घडीला त्याच भाऊबंदांचा संघर्ष लावून देण्याचं काम इथले राजकारणी करत आहेत. पुणे परिसरातील मुंढवा भागात मराठा व माळी हे लग्न समारंभाच्या काळात एकमेकांना पत्रिका देत नाहीत तर केवळ तोंडी निमंत्रण देतात. कारण काय तर भावकीत पत्रिका देण्याचा रिवाज नाही व  नसतो. भावकीत राम राम ही घातला जात नसल्यामुळे ते एकमेकांना भेटल्यावर राम राम घालत नव्हते. याचा असा अर्थ होतो की पुणे परिसरात मराठा व माळी ह्या अलीकडील काळातील बनलेल्या दोन जाती सकुल्य, सपिंड म्हणजे एकाच गणाच्या होत्या. भाऊच होते. 

म्हणून देवी , नवरात्रोत्सव , घटस्थापना हा सण काही एका जातीचा वारसा नव्हे. तो सबंध देशाचा, सबंध भारतीयांचा, सर्वाच जाती-जमातींचा होता.आहे.






लेखक
नितीन सावंत परभणीकर
मो : 9970744142




घटस्थापनेचा पहिला दिवस - सिता जन्मोत्सव | भाग 1

नवरात्र उत्सव रात्र दुसरी कौल देनारी आंबाबाई | भाग 2

नवरात्रोत्सव रात्र तिसरी - हिंगुळजा भाग 3

नवरात्रोत्सव रात्र चौथी तेरणा मांजरेची गणमुख्या - कुलस्वामिनी तुळजाभवानी भाग 4

नवरात्रोत्सव रात्र पाचवी आईचे हृदय - माहुर भाग 5

 नवरात्रोत्सव रात्र सहावी - हारितीचे स्त्रीराज्य भाग 6

नवरात्र उत्सव रात्र सातवी वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली भाग 7


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने