नवरात्रउत्सव रात्र 7 वी वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली भाग 7 | Deehindavi

 

नवरात्र-उत्सव-रात्र-सातवी-वैशालीची-जनपद-कल्याणी-आम्रपाली-Deehindavi
नवरात्रउत्सव रात्र 7 वी वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली | Deehindavi

नवरात्रउत्सव रात्र 7 वी वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली

समभोगागृह अर्थात सभागृह हा काळानुरूप अर्थ बदलत आलेला एकाच वास्तूचा शब्द आहे. जिथे सामान उपभोग घेतला जात होता. सामान वाटणी केली जाईची, समन्याई चर्चा केली जातहोती ते साभाग्रह आहे. स्त्रीसत्ताक गणव्यस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती व तिच्यासमोर सभा समीती भरली जायची. स्वैरसंभोग ही त्या काळाची नैसर्गिक उपज होती. हाच धर्मपूर्व धर्म होता. म्हणजे गणवृध्दीसाठी जास्तीत जास्त लेकरे जन्माला घालने हा धर्मपुर्व धर्म होता.इतिहासात आम्रपालीला गणिका म्हटले आहे. ती गणिका म्हणजे गणाची मालकीन, गणाच्या जमिनीचे मापून, मोजून (गणना) करुन आपल्या कुलात समान वाटप करणारी अर्थात गणराज्ञी होती. परंतू आजघडीला पुरूषसत्ताक ब्राम्हणी राजक व्यवस्थेने तिला वेश्या बनवून दुष्ट नेनीवेत ढकलले आहे. आज गणिका म्हणजे वैश्या असा आर्थ लावला जातो. तिने बौद्ध भिख्खुंच्या विश्रांतीसाठी आंब्याचे वन दान दिले आणि ती आपला रथ हाकताना राजेराजपुत्रांच्या बरोबरीने हाकायची या अधिकाराने ती मालकीन होती, बंद खोलीतली केवळ उपभोगाची वस्तू नाही. वैश्या नाही.


वैशाली हा अराजक संघगण होता आणि आम्रपाली संघगणाची नगरवधू होती

वैशाली हा अराजक संघगण होता आणि आम्रपाली संघगणाची नगरवधू होती म्हणजे त्या गणाला लोकशाही मार्गाचा दर्जा बहाल करनारी, तो गण उध्वस्त न होऊ देणारी, त्या नगराचे ऐक्य अबाधीत ठेवनारी ती जनपदकल्याणी होती. स्त्रीसत्तेचे महत्व कमी होत असताना पुरुषसत्ताक राजवटी उभ्या रहात असतानाच्या काळामधील आम्रपाली आहे. म्हणजे तीचा गण वा संघगण लोकशाही प्रधान आहे, मात्र लोकशाही टिकून ठेवण्यास ती निमीत्तमात्र होती. बहुतांश हक्क अधिकार आता तिच्या हातून निसटून गेले होते. स्त्रीयांचे गणप्रमुख म्हणून असणारे हक्क आधिकार कमी होण्याच्या काळातील ती मावळतीची गणीका झाली.

येथे मातृसत्ताक व्यवस्था क्षीण झाल्याचे दिसुन आले.

या अराजक संघगणात पुष्करणीत पुरुषांना अभिषिक्त सिचन विधीद्वारे गणसभासदत्व मिळविण्याची गरज उरलेली नव्हती तर ते आता सहज सभासद होतात. येथे मातृसत्ताक व्यवस्था क्षीण झाल्याचे दिसुन येते. परंतु तिचे अवशेष मात्र पहायला मिळत होते. जसे तथागताची आई महामाया ही एका वनात झाडाच्या फांदिला धरुन प्रसूत झाली. तिने तिच्या गणाच्या पुष्करणी जवळ जावून, आपल्या मंगल अशा कुल वृक्षाच्या फांदीला धरून बुद्धाला जन्म दिला होता. आम्रपाली सुद्धा आंबवनात पुष्करणीजवळ सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली पडले आहे.

ती वेश्या होती म्हणून नाही.

अनेक राजे राजपुत्रांच्या जेवनाचे आमंत्रण नाकारीत, बुध्द वैशाली गणाची गणप्रमुख आम्रपालीकडे जेवायला गेले ती वेश्या होती म्हणून नाही तर ती लोकशाही पद्धतीने संघगण चालवण्यास मदत करीत होती म्हणून.  कुण्या एका राजपुत्राकडे बुद्ध जेवायला गेले असते तर इतर राजपुत्रांना खेद वाटायला लागला असता. आम्रपाली मात्र या सगळ्या राजपुत्रांच्या वरची, छोट्या छोट्या राजक बनत चाललेल्या गणांची लोकशाहीवादी नाममात्र गणिका आहे. अराजक संघगणात जमीन ही एका व्यक्तीच्या मालकीचे नाही तर संपूर्ण संघाच्या मालकीची आहे  असे म्हणून अराजक संघगणात गणसभासदांच्या परवानगी शिवाय जमीन दान देता येत नव्हती. येथे मात्र आम्रपाली बुद्धाला आंब्याचे वन दान द्यायची. म्हणजे गणाची ती जनपदकल्याणी असल्याने तिला तसे करता येत होते. एकूण या गणाच्या महत्त्वाच्या सण वार उत्सवाच्या वेळेला आम्रपालीला विशेष असे काही अधिकार त्या वेळेला होते.

प्रत्येक स्त्रीसत्तेच्या राज्याची एक वेगळी शेती होती त्यावरून त्या गणराणीची ओळख होती.

  • जसे सिंधू नदीच्या खोऱ्यात निर्ऋती गाळपेराच्या भाताची शेती करत होती.
  • गोदिवरीच्या किनाऱ्यावर शूर्पणखा सरकती (shifting) शेती करत होती
  • तेरणा मांजरेच्या परिसरात तुळजाई कदंबाच्या वनात वास करत होती आणि गाळपेराच्या भातशेती बरोबर, सरकती शेतीही करायची.
  • तर पंचगंगेच्या किनाऱ्यावर अंबाबाई फळे भाज्यांच्या शेतीची मालकीन पण होती.रेणुका सुद्धा कर्नाटकातून महाराष्ट्राकडे सरकती शेती करत आलेली आहे.

या आपल्या महान गणराण्या आज कोणत्या न कोणत्या मार्गाने मिथके बनून दुष्ट-सुष्ट किंवा व्यक्तीगत-सामूहिक नेनीवेत बंदिस्त आहे. त्यांना या ब्राम्हणीकरनाच्या कैदेतून अब्रा म्हणी बहुप्रवाही विधायक भौतीकवादी अन्वेषनाच्या पद्धती वापरून व जानीव नेणिवेच्या तर्कशास्त्राच्या आधारे मुक्त केले पाहीजे.

आम्रपालीचा उद्धार तथागतांनी केलाच पण ती पुन्हा एका नव्याने मुक्त झाली मिथकांच्या कैदेतून. वैश्येचे उलटे चाक फिरून ती जनपदकल्याणी बनली. ती नगरवधूची उलटीबाजू स्त्रीसत्तेचा वारसा ठरली होती. 





लेखक
नितीन सावंत परभणीकर
मो : 9970744142












टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने