नवरात्रोत्सव रात्र सहावी - हारितीचे स्त्रीराज्य भाग 6 | Deehindavi

 

नवरात्रोत्सव-रात्र-सहावी-हारितीचे-स्त्रीराज्य-deehindavi
नवरात्रोत्सव रात्र सहावी - हारितीचे स्त्रीराज्य 

नवरात्रोत्सव रात्र सहावी - हारितीचे स्त्रीराज्य 

अब्राम्हणी परंपरेत रात्र हे विचार विनीमयाचे, औषधे कुठण्याचे, डिबेटचे, औषधे तयार करण्याचे, शेव चिकित्सा करण्याचे, रसविद्येचे थोडक्यात संस्कृती आणि आध्यात्मवादाचे केंद्र आहे. मातृसत्तेत, स्त्रीसत्तेत हे सर्व रात्री चालत होते. म्हणून दिवटी, दिपमाळा यांना स्त्रीवादी सणवार उत्सवांत फार महत्व देत आहे. या कारणाने नवरात्रोत्सवात आजही आराधी,  गोंधळी, जोगती रात्रभर जागरण करतात. गाणी म्हणतात लोककथांचे कथन करतात. पितृसत्ताक पुरुषवर्चस्ववादी परंपरांनी नंतर उलटा सुड घेताना रात्र अशुभ मानली. अमावस्या अशुभ मानली. तसा प्रचार केला. म्हणून ब्राम्हणी व्यवस्थेचे विधी दिवसा होतात. त्यांच्या दृष्टीने दिवस शुभ आणि तांत्रिक, मांत्रिक विधी रात्री होतात. अब्राम्हणी परंपरेत रात्र शुभ, काळा रंग शुभ. म्हणून महाकाली हे काळ्या रंगाची आहे.

दक्षिण भारतीय संस्कृती काळ्या रंगाची दृविडांची.या भागाची सर्वाधिक जुनी गणराज्ञी हरिती होय.

हरिती :

हरिती, श्रीशैलच्या स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेची गणमुख्या. कृष्णा नदीच्या खोरयातील निर्ऋतीच्या परंपरेतील वैराज्याची ती राष्ट्री होती.भारतात फळे भाज्यांच्या शोधापासून ते मानवी मनाच्या आवस्थांपर्यंत , चमड्याच्या रोगांपासून शस्त्रक्रियांपर्यंत संशोधनाचे काम या श्रीशैल्यच्या स्त्रीराज्यात उभारीस आले होते.पुढे विविध क्षेत्रात तरबेच, निष्णात ६४ योगीनी आणि ८४ सिद्ध परंपरा या हरितीच्या स्त्रीराज्याच्या श्रीपर्वताच्या छायेतून उदयाला आली.

हे स्त्रीराज्य एकेकाळी वैचारिक आणि तत्वज्ञानात्मक बाबतीत अतिच्च आणि एक आगळावेगळा दबदबा ठेवून होते:

हे स्त्रीराज्य एकेकाळी वैचारिक आणि तत्वज्ञानात्मक बाबतीत अतिच्च आणि एक आगळावेगळा दबदबा ठेवून होते. म्हणून भारतातील कुठल्याही तत्वज्ञाला आपल्या ज्ञानाची खोली तपासायची असेल तर तो अंतिम डिबेटसाठी या हारितीच्या स्त्रीराज्यात येत होते. येथे अनेक विचारवंत महिनोमहिने किंवा कित्तेक वर्षे महाडिबेट करत असत. हारितीचे स्त्रीराज्य दक्षिण भारतातील कृष्णा नदीच्या खोरयातील द्रविडांची गणभुमी आहे.

मानवी मन द्वैती असते हा शोध हरितीच्या स्त्रीराज्याचा:

वसुबंधू, दिग्नाग या महायानी स्कूलच्या तत्वज्ञानी, विचारवंतांनी मांडलेला द्वैती मनाचा सिध्दांत ह्याच तर स्त्रीराज्याची देन आहे. मानवी मन द्वैती असते हा शोध हरितीच्या स्त्रीराज्याचा आहे. या हारितीच्या श्रीशैलमच्या स्त्रीराज्यात अनेक बौद्ध आचार्य डिबेटसाठी येत होते. शुन्यवादाचे जनक नागार्जुन सुद्धा कित्तेक वर्षे या परिसरातील पर्वतावर ज्ञानार्जन करत असत. म्हणून हरितीची मुर्ती नालंदा विद्यापीठाच्या समोर होती, हे चिनी प्रवाशांनी आपल्या नोंदीत नोंदवून ठेवले आहेत. नालंदा विद्यापीठ हरितीला ज्ञानाचे प्रतिक मानत असल्याचे निदर्शनास येतात. हरीतिच्या पूजनाने या विद्यापीठाची सुरुवात होईल.

चक्रधर स्वामींच्या संदर्भाने त्यांच्याकडे आलेले स्त्रीवादी विचार:

श्री चक्रधर स्वामींच्या संदर्भाने त्यांच्याकडे आलेले स्त्रीवादी विचार हे या श्रीशैलच्या योगिनी कडून आल्याची मांडणी श्री पर्वताच्या छायेत या ग्रंथात, रा.ची. ढेरे यांनी केलेली आहे. याच स्त्रीराज्यातील काही विचार पुढील काळात चक्रधर स्वामी उजागर सांगत असत. मासिक पाळी वाईट नसते हा त्यातलाच एक विचार.जसा माणसाला शेंबुड तसी मासिक पाळी हे जाहिररित्या चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहे.यावरून चक्रधर स्वामींची स्त्री राज्यातील काही योगिनींशी चर्चा झाल्याची लक्षात येते.

श्री शैलच्या योगिनी मुक्ताबाई यांच्या शिष्यपरंपरेची शाखा विसोबा खेचरांच्याद्वारे संत नामदेवांपर्यंत येते. आयुष्यात एकदातरी श्री शैलमला जावुन मनाचा बळी देइल असे संत नामदेव आपल्या अभंगात म्हणत होते.

नाथ सांप्रदायाचे संस्थापक मच्छिंद्रनाथ या स्त्रीराज्यात कित्तेक वर्षे राहिले होते. पुढे गोरक्षनाथ त्यांना भेटायला आल्यानंतर दोघांनी भारतभर नाथ सांप्रदाय वाढवला. म्हणजे नाथ आणि वारकऱ्यांची एक शाखा हरितीच्या स्त्रीराज्याचा जीवनरस घेवून विकास पावत होती.

लिंगायत धर्माच्या अनुभव मंड्डपचे पहिले आचार्य अलामप्रभु आणि दुसरे आचार्या अक्कमहादेवी हे दोघेही श्री शैलमचे होते. त्यांच्या समाध्या तिथेच कर्दळीच्या बनात आहेत.हरितीच्या स्त्रीराज्यातून लिंगायत धर्माला दोन महान आचार्य मिळाले.

म्हणजे नाथ, वारकरी, लिंगायत, महानुभाव यांचा श्रीशैलमच्या स्त्रीराज्याशी थेट किंवा कोण्यान कोण्या मार्गे संबंध आहे. याच स्त्रीराज्याने  हे समतेचे, जातीअंताचे भक्ती सांप्रदाय जन्माला घातले, असे म्हणायला जागा आहे.

कालिदास आणि त्यानंतरच्या अनेक विद्वान कवी लेखकांनी हरीतिच्या स्त्री राज्याबद्दल नकारात्मक भाव दाखवलेले आहेत.

म्हणजे ब्राम्हणी छावणीला हे समतेचे तत्वज्ञान निर्माण करनारे स्त्रीराज्य डोळ्यात खुपत होते. याच स्त्रीराज्यातून कालिदासाला पराभूत करनारे तत्वज्ञ जन्माला आलेले होते.

१४ विद्या आणि ६४ कलांत एकापेक्षा एक निष्णात स्त्री पुरुष या स्त्रीराज्याने दिले आहे. तरिही ब्राम्हणी व्यवस्थेने तिला लेकरे पळवून नेनारी राक्षसी म्हणून रंगवले आहे. तिचे दुष्ट नेनीवेकरण केलेले आहे.

येथे मृत शरिरांवर प्रयोग केले जात:

येथे मृत शरिरांवर प्रयोग केले जात. रसविद्या, औषधोपचार शिकविले जात. खाण्यासाठी लागणाऱ्या नव्या भाज्यांचा शोध लावला जाई. नालंदा विद्यापिठाच्या समोर हारितीची भव्य मुर्ती होती आणि तिची पुजा करुन विद्यापीठ सुरु होत होते, असे चिनी प्रवासी फाइहान नोंदवून ठेवत होते. म्हणजे ज्ञान परंपरेची जननी हारिती आहे. सरस्वती नव्हे.

ही याच मुरैनाच्या 64 योगिनींच्या सभेची प्रतिकृती आहे:

मध्यप्रदेशातील मुरैना येथे उंच डोंगरावर असलेले 64 योगिनींचे मंदिर हे हरीतिच्या स्त्री राज्याची देण आहे. भारताच्या जुन्या संसदेची गोलाकार प्रतिकृती याच मुरैनाच्या 64 योगिनींच्या सभेची प्रतिकृती आहे. त्या तिथे गोलाकार बसून महाडिबेट करत असत. ज्ञानावर नव्या संशोधनावर चर्चा करत असत. आपली संसद ही त्यासाठी होती.

ढोबळमानाने हारितीची मुलगी हरिती, वैय्याकरण होती, तिच्या स्त्रीराज्याचा आढावा ! वैचारिक आढावा. तिचा कुलपट , वाढत गेलेला गण , त्याचा विस्तार हे आजुन उकल व्हायचे बाकी आहे.



लेखक
नितीन सावंत परभणीकर
मो : 9970744142










टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने