नवरात्रोत्सव रात्र चौथी तेरणा मांजरेची गणमुख्या - कुलस्वामिनी तुळजाभवानी भाग 4 DeeHindavi

 

नवरात्रोत्सव-रात्र-चौथी-तेरणा-मांजरेची-गणमुख्या-कुलस्वामिनी-तुळजाभवानी-भाग 4-DeeHindavi
नवरात्रोत्सव रात्र चौथी तेरणा मांजरेची गणमुख्या - कुलस्वामिनी तुळजाभवानी भाग 4 DeeHindavi

नवरात्रोत्सव तेरणा मांजरेची गणमुख्या - कुलस्वामिनी तुळजाभवानी भाग 4 DeeHindavi

जगभरातील स्थिरस्थावर मानवी सभ्यतेची सुरुवात स्त्रीयांपासुन होते. गरोदरपणात भटक्यांच्या टोळीतील स्त्रीया लांब आणि जास्त प्रवास करु शकत नव्हते. त्यातून त्यांनी पाण्याच्या, जलाशयाच्या आसर्याने नैसर्गिक गुफा आणि झाडांच्या मोठ्या खोडात रहाणे पसंत केले आहे. या प्रारंभिक स्थिर होण्यातून पुढे शेती, नृत्य, रेखाटन, रंगरंगोट्यांचा शोध स्त्रीयांनी लावला. सुरुवातीला संपूर्ण गण एकत्र रहायचा. म्हणून गण सांभाळणारी गणाची प्रमुख राज्ञी किंवा राष्ट्री बनली. पुढे गणातून ज्ञाती फुटुन वेगळ्या झाल्या. ज्ञातींची कुळे झाली आणि नंतर कुळाचे कुटुंब बनत गेले होते. आशीच महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे आणि कुळांची पुर्वजा म्हणजे तुळजाभवानी आहे. हा काळ वंश समाजाचा या काळात अजून वर्ण व्यवस्था सुरू झाली नव्हती. वर्णंताच्या क्रांतीनंतर जाती व्यवस्था सुरू झाली. म्हणून तुळजाभवानी मातेला एखाद्या जातीचे प्रतीक बनवता येणार नाही.

तुळा म्हणजे तोलने,

तुळा म्हणजे तोलने, मोजने, मापणे किंवा वाटुन देने आहे. तुळजा म्हणजे मोजुन देनारी, समान वाटुन देनारी, तुळा करणारी असे आहे. तेरणा मांजरेच्या किनाऱ्यावर आपल्या वाढत जाणाऱ्या गणाला पोसण्यासाठी जमीन वाटून तसेच सामूहिक गणाने काढलेल्या पिकाचे परडीने समसमान हिस्यांत गणात वाटप करणारी गणमुख्या म्हणजे तुळजाई.आजच्या भौगोलिक प्रदेशात बालाघाट डोंगर रांगामध्ये समुद्र सपाटीपासून २७० फुट उंचीवर वसलेले गाव म्हणजे तुळजापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे हे ठिकाण. धर्मग्रंथात दंडकारण्य म्हणून या भागाचा उल्लेख सापडतोय.

म्हणून महाराष्ट्राची ९६ कुळे वसवणारी आद्य गणराज्ञी म्हणजे तुळजा भवानी होय.

पुढे तिने वाढत गेलेला गण आपल्या चार ज्ञातींना विभागून दिला होता. एका ज्ञातिच्या वाट्याला २४ कुळे आली. या चौघींची २४ कुळे मिळुन ९६ कुळांची संख्या बनली. म्हणून महाराष्ट्राची ९६ कुळे वसवणारी आद्य गणराज्ञी म्हणजे तुळजा भवानी होय. कदंब वृक्ष हा तिचा कुलवृक्ष आहे. पुढे कदम आडनावाचे भोपी तिचे प्रमुख पुजारी बनले होते. कदम गोंधळी देखील तुळजाभवानीचे लाडके प्रचारक होते किंवा आहेत.

परंतू हा काळ वंशसमाजाचा. येथे अजुन जातीव्यवस्था जन्माला आलेली नव्हती. त्यामुळे ही कुळे एकजातीय नाहीत. आजच्या जातीव्यस्थेत दाखवली जानारी कुळे जी आहेत ती वंशसमातील कुळांची कॉपी किंवा भ्रष्ट स्वरुप आहे. आज कुनाचेही कुळ शुद्ध उरलेले नाहीत.

आजही सर्व ग्रामदेवता आकारहीन दगडातच आहेत.

तुळजेचा काळ हा शिल्पकलेचा शोध लागण्याच्या आधिचा होता. त्यामुळे तिचे मुख्य प्रतिक आकारहीन दगडाचे होते. तुळजापूरची घाटशिळा हेच खरे तिचे स्मृतीस्थळ आहे. पुढे मुर्तीकलेच्या शोधानंतर तुळाजाई मुर्ती स्वरुपात आली. आजही सर्व ग्रामदेवता आकारहीन दगडातच आहेत.

ब्राम्हणी छावणीच्या उन्मादा नंतर अनेक पुर्वजांचे, ग्राम संरक्षक मातृकांचे मानवी स्वरूप लपवून त्यांना पुढे अलौकिक दैवत्व बहाल केले होते.

या प्रकारात एक तर त्यांच्याबद्दल दुष्ट आफवा परवल्या गेल्या अलौकिकत्व देवुन त्यांचे सुष्ट नेनीवेकरन करण्यात आले होते.

मराठीतल्या शिव्या रंडकी चंडकी ह्या रंडी चंडी स्त्रीयांच्यावरुन निर्माण झालेल्या होत्या.

मराठीतल्या रंडकी चंडकी ह्या शिव्या रंडी चंडी स्त्रीयांच्यावरुन निर्माण झालेल्या आहेत.कुलटा म्हणजे या गणातून त्या गणात व्यापार,व्यवहार,औषध उपचार करण्यासाठी फिरनारी राज्ञी होय.आज कुलटा शब्दाला वाईट अर्थ निर्माण करुन दिला गेला आहे.गणीका म्हणजे नाचनारी नव्हे.गणाची प्रमुख ती गणीका. 'तुझ्यावर मर्ऱ्या मायचा गाडा येवो ' अशी देखील खेड्यात मरी आईची बदनामी करणारी शिवी आहे. आशा अनेक शब्दांच्या द्वारे पितृसत्ताक समाज व्यवस्थेत स्त्रीयांची टिंगल टवाळी केली गेली आहे. आज घडीला सर्वाधिक शिव्या स्त्रीयांवरुनच आहेत. शिवी सुद्धा शिवाच्या बायकोचे नाव आहे.

अगदी याच प्रमाणे आज तुळजाभवानीचा पट जुगाराचा पट म्हणून सांगितला जातो.

अगदी याच प्रमाणे आज तुळजाभवानीचा पट जुगाराचा पट म्हणून सांगितला जातो. तुळजाभवानी भारती बुवांच्या मठात जुगार खेळायला जाते, अशाप्रकारे भाविकांत एक मिथक पसरवण्यात आलेले होते. जे चुक आहे. तुळजाभवानीचा चौपट हा गणभुमीचे समान वाटप करनारा पट आहे.त्या पटावर ती आपल्या गणभूमीचे समसमान वाटप करत असे. वंशसमाजात आधी गण त्यांची मुख्या गणराज्ञी. मग तिच्या लेकी, मुली ह्या ज्ञाती होत. पुढे ज्ञातीची कुले बनली.त्यानंतर कुलांचे कुटुंब बनत असे आणि एक कुटुंब काही मैलांवर जावून नवे गाव वसवी. त्यामुळे अनेक नदी किनारी सर्व समान आडनावाची अनेक गावे सापडत असतात. ज्यांचे देवक, कुलचिन्ह एकच असते त्यांच्यात विवाह होत नाही. ती म्हणजे भाऊबंदकी. जाती समाजात आज कुटुंबव्यवस्था परार्थीकरणातून परात्म बनत चाली. त्यामुळे एक व्यवस्था जाऊन नवी व्यवस्था येने अपरिहार्यच आहे.तुळजाईच्या विविध ज्ञाती पुढे अनेक नदीकिनाऱ्यावर शेतीयोग्य जमीन शोधत नवे गावे वसत गेल्याचे दिसून येते. गावे वसवताना तिच्या गणाच्या, ज्ञातिच्या वंशजांनी आपल्या पुर्वजा भवानीचे ठाणे जागोजागी उभे केले गेले होते. तिचा इतिहास विविध मार्गाने जपून ठेवला जायचा. असेच देवीचा इतिहास जपून ठेवनारे गोंधळी आहेत, आराधी, भोपे, पोतराज, तृतीय पंथी होते.

महाद्वारा जवळ असणारी मातंगी, यरमाळ्याची येडेश्वरी, 

तुळजापूरच्या तुळजाभवानीला काळाच्या प्रत्येक पटलावर राजाश्रय मिळत केलेला आहे. कदंब राजांपासून, छत्रपती शिवरायांच्या पर्यंत ती मोठ मोठ्या राजे महाराजांना देखील भुरळ घालत आलेली आहे. महाद्वारा जवळ असणारी मातंगी, यरमाळ्याची येडेश्वरी, आंबेजोगाईची योगेश्वरी ह्या तिच्या उपशाखा म्हणजे ज्ञाती असायला हव्यात. तुळजापूरच्या तुळजाभवानीचे ठाणे महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील देवीचे भोगाव हे तुळजापूरच्या तुळजाभवानीचेच एक ठाणे मानले जाते.

नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये बोकडाचा बळी देणे ही चालत आलेली परंपरा पुरुष मेधाचे प्रतीक आहे.

या लोकदैवतांच्या पूजना मध्ये कवडी किंवा कवड्यांच्या माळेला विशेष महत्त्व देतात. कवडी हे स्त्रीयोनीचे प्रतिक आहे. अर्थात सुबत्ता, भरभराट, या अर्थाने पुढे कवडी ही चलनाचं प्रतिक बनत गेली. आजही ग्रामीण भागात 'मी तुला फुटकी कवडी सुद्धा देणार नाही 'या अर्थाने जो वाक्यप्रचार वापरतात तो कवडी हे चलनाचे प्रतीक असल्याचा एक पुरावा आहे.

हा नैतिकतेचा नियम

मातृसत्ताक आणि स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत नैतिक अनैतिकतेच्या संकल्पना सुफलीकरणावर अवलंबून होत्या. आपल्या गणाची वृद्धी व्हावी . गण वाढावा यासाठी त्या गणातील स्त्रीयांनी जास्तित जास्त आपत्य जन्माला घातली पाहिजेत हा नैतिकतेचा नियम .साथीच्या रोगांमुळे अनेक गण जागीच मुडद्यांच्या खाईत लोटले जात असत किंवा दुसऱ्या रानटी टोळींच्या आक्रमण काळात आपल्याकडे लढाऊ फौज असली पाहिजेत म्हणून जास्त आपत्य जन्माला घालणे आणि आपला गण कुळ वंश टिकवून ठेवण्यासाठी हे सुफलीकरण विधी करुन संतती निर्माण केली जाई . ती त्या काळाची उपज होती . या सुफलीकरणाच्या विधीत स्त्रीयोनीचीही पुजा केली जाई. महाराष्ट्राभर सापडलेले लज्जागौरीचे शिल्पे याचे पुरावेच आहेत . यासंदर्भात राचिंढेरे यांनी लज्जागौरी नावाचे स्वतंत्र पुस्तकही लिहीले आहे . या सुफलीकरणाचे एक प्रतिक म्हणून कवडीला मानपान मिळाला. याच कारणास्तव  सुफलीकरनाचे प्रतिक म्हणून कवडी पुजली जाते.

तुळजाभवानी, येडेश्वरी, अंबाबाई, रेणुका, सप्तशृंगी अनेक  लोकदैवतांच्या परंपरेत कवड्याच्या माळेला विशेष महत्त्व देतात. हा सर्व अब्राह्मणी परंपरेचा भारताचा अत्यंत महत्त्वाचा इतिहासाचा भाग आहे. या वास्तववादी इतिहासाकडे डोळेझाक करून चालणार नाही.




लेखक

नितीन सावंत परभणीकर
मो : 9970744142







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने