नवरात्रोत्सव रात्र तिसरी - हिंगुळजा भाग 3 | The Third Night Of Navratri Festival | Deehindavi

 

नवरात्रोत्सव-रात्र-तिसरी-हिंगुळजा-The-Third-Night-Of-Navratri-Festival-Deehindavi
नवरात्रोत्सव रात्र तिसरी - हिंगुळजा | The Third Night Of Navratri Festival | Deehindavi

नवरात्रोत्सव रात्र तिसरी - हिंगुळजा | The Third Night Of Navratri Festival


नवरात्रोत्सव हा मातृसत्ताक गणव्यवस्थेचा सर्वात मोठा सण.

नवरात्रोत्सव हा मातृसत्ताक गणव्यवस्थेचा सर्वात मोठा सण आहे. शक्ती म्हणजे स्त्री. म्हणून शक्तीचे उपासक ते शाक्त. नवरात्रउत्सवात मातृदेवतेची आराधना केली जाते. या सर्व मातृदेवता एकेकाळच्या गणराण्या होत्या. सिंधुनदीच्या किनाऱ्यावर निर्ऋतीचे राज्य होते. गोदावरीच्या किनाऱ्यावर शूर्प-णखा कृषीप्रधान स्त्री-राज्य चालवत होत्या. पंचगंगेच्या किनाऱ्यावरच्या अंबवनाची गणराज्ञी अंबाबाई होती. आपल्या चार लेकींना (ज्ञाती) समान चार भागात म्हणजे ९६ कुळात शेती वाटुन देणारी तुळजाई, हा तेरणा-मांजरेचा देश समतेवर चालवत होती. या शाक्त परंपरेत भेदाभेद नाही, की असमानता नाही.प्राच्यविद्यापंडीत कॉ शरद पाटील म्हणतात "शाक्तांची ठाणी अस्पृश्य (मातंग) वस्तीत सापडतात." म्हणजे बहुतांश स्त्रीदेवतांच्या मुख्या पुजारीण मातंग स्त्रीया आहे.

गावात गोंधळी आला तर तो आधी मातंगाच्या घरी वाजवतो,

अगदी त्याच प्रमाणे आजही नवरात्रोत्सवात मातंग स्त्रीची परडी भरल्याशिवाय वरच्या जातीतल्या स्त्रीया जेवन सुद्धा करत नाही. गावात गोंधळी आला तर तो आधी मातंगाच्या घरी वाजवतो, मग इतरांच्या. हे लेकरं वाचत नसतील, जगत नसतील तर ती मातंग स्त्रीच्या ओटीत टाकली जातात. मातंग आईचे दूध पिऊन ते बाळ त्या घरी लहानपण घालवत होते. पुढे जाती समाजात मातंग अस्पृश्यतेत लोटले गेले आहे.

नवरात्रोत्सव-रात्र-तिसरी-हिंगुळजा-The-Third-Night-Of-Navratri-Festival-Deehindavi

कवडी हे प्रजननाचे प्रतीक आहे.

कवडी हे प्रजननाचे प्रतीक आहे. नवनिर्मीतीचे प्रतीक म्हणून कवडी ही शाक्त संस्कृतीत पुजनीय मानली गेली. इंग्रज येईपर्यंत भारतामध्ये कवडी ही चलन म्हणून सुद्धा वापरली जात होती. तुला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही हा वाक्यप्रचार कवडी हे संपत्तीचे एकक असल्याचा आज पुरावा आहे.

आपली आई आपल्याला सर्वकाही देते.

आपली आई आपल्याला सर्वकाही देते. ती कशाचीही कमी पडू देत नाही. ती सर्वांना धान्य भरभरून देते या अर्थाने परडी धान्य देण्याचा टोकरा पुजनीय मानली जाते. हे वंशसमाजातील लोकोत्सव असल्याने येथे भेदभाव नव्हता. या नवरात्रोत्सवात अशा अनेक अब्राम्हणी परंपरा आपल्या दिसायला लागतील. ज्यांमधे इतिहास आहे. तुम्हाला काही मिथके दिसतील, त्याला तत्काळ नकार देण्याऐवजी मिथकांची सोडवणूक केली पाहिजे. मिथके उलगडली पाहिजेत. या नवरात्रोत्सवाला ब्राम्हणी छावनीत लोटुन आपल्याला काही साध्य होनार नाही. आता अब्राम्हणी करणाची प्रक्रिया जोमाने राबवली गेली पाहिजे.

आपण नवरात्रोत्सवात आनेक गणराज्ञ्यांचा, गणमातेचा आढावा घेत आहोत. त्यात आज बघुया हिंगुलांबीका किंवा हिग्लाजमाता बद्दल.

त्यापैकी खैबर खिंडीच्या मुखाजवळ भारतीय व्यापाऱ्यांना संरक्षण देणारी,

जगभरामध्ये मानवी सभ्यतेचा विकास हा स्त्रियांनीच केल्याचा अलीकडे सर्वमान्य झाले होते. जगभरातील सर्व संस्कृतीच्या आद्य ह्या स्त्रियाच राहिलेल्या आहेत. भारतीय समाज व्यवस्थेत देखील लोक मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या ज्या दैवता आहे. त्या एकेकाळी राज्य चालवणाऱ्या होऊन गेलेल्या स्त्रियाच होत्या. पुढे त्यांचं आलॊकीकरण किंवा ब्राह्मणीकरण झालं आहे. भारतातील सर्व लोकदैवता, मातृदैवता चमत्कारांनी इतक्या वेढल्या गेल्यात की त्यांचं मूळ स्वरूपच हरवल गेलं आहे. तरी देखील मीथकांच्याद्वारे, लोकपरंपरांच्याद्वारे सणवार उत्सवांच्याद्वारे तथा गावांच्या नद्यांच्या आणि बोली भाषेच्या अभ्यासाच्या द्वारे आपल्याला काही महत्त्वाचे पुरावे मातृसत्ताक स्त्रीसत्ताक इतिहास उलगडण्यास मदत करतात. त्यापैकी खैबर खिंडीच्या मुखाजवळ भारतीय व्यापाऱ्यांना संरक्षण देणारी, एक गणराज्ञी पाहूया.

हिंगोळ नदीच्या किनाऱ्यावर तिचे साम्राज्य.

हिंग्लाजमाता ही पाकिस्तानातील बलुचिस्तान भागातील मकराण येथे वास्तव्याला असनारी एक गणराज्ञी होय.हिंगोळ नदीच्या किनाऱ्यावर तिचे साम्राज्य होते.पाकिस्तानातील कराची शहरापासून 250 किमीवर लासबेला जिल्ह्यात हे ठिकाण आहे.स्थानिकचे लोकं तिला नानी देवी म्हणतात. नानी म्हणजे आईची आई.अर्थात हे संबोधन सुद्धा मातृसत्ताक वारसा सांगणारे आहे.

राजपुत समाजाने याच हिंगलाज मातेला करणीमाता म्हणून स्वीकारलेले होते.

हिंगुळादेवी हे सुद्धा तिचे एक उपनाव. हिंगुळा म्हणजे रक्तवर्णी. सीमेवर रक्त सांडणारी ती रक्तवर्णी. राजपुत समाजाने याच हिंगलाज मातेला करणीमाता म्हणून देखील स्वीकारलेले होते. भारताचा जगभर होनारा व्यापार याच हिंगुळादेवीच्या परिसरातून खैबरखिंडीमार्गे होत असे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरचा व्यापर युरोपात होत असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे परकीय आक्रमणे थोपवनारी ही युद्धराज्ञी होय. या देवीच्या हतात जास्तित जास्त आयुधे आहेत. म्हणजे ही सीमेवरली सरक्षंण देवता होय. व्यापर करणाऱ्या लोकांना संरक्षण देनारी ही राज्ञी पुढे व्यापारी लोकांची देवता झाली. आणि त्या व्यापाऱ्यांनी तिला देशभरात नेले. तिथे ठाणे स्थापन केले गेले. मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात या हिंग्लाजमाता देवींची मंदिरे आहे. आज व्यापारी जातींपैकी स्पेशली भावसार समाज, रंगारी समाज या देवीचा उपासक आहेत. हिंगोली जिल्हाचे नाव सुद्धा या देवीच्या नावावर आहे. कोल्हापूरचा गडहिंग्लाज तालुका सुद्धा याच देवीचे नामनिर्देशन करतो. हिंगणा हा नागपूर जिल्ह्यातील तालुका आणि हिंगणघाट हा वर्धा जिल्ह्यातील तालुका या देवींच्या नावाच्याच स्मृती आहे. 

व्यापार करणाऱ्या व्यापारी.

म्हणजे हिंगोली व गडहिंग्लज तालुक्यापासून पासून ते थेट युरोपापर्यंत व्यापार करणाऱ्या व्यापारी जातींना संरक्षण बहाल करण्याचं काम ही हिंगुळजा करत असे. हिच्या गणाचे टोटम उंदीर होते. पुढे हाच उंदीर गणपतीच्या पुढ्यात लोकपरंपरेन आला. हिंगूळजेच्या गणाचं टोटम असलेला उंदीर गणपतीच्या पुढ्यात कसा आला याबद्दल सुकन्या आगाशे यांनी मागोवा मीथकांचा या पुस्तकामध्ये सुंदरशी मांडणी केली आहे.

उंदरासारखे अत्यंत चपळ असणारे लोक.

उंदरासारखे अत्यंत चपळ असणारे लोक, हिंगुळजेच्या गणामध्ये जमिनीला छिद्रे पाडून, जमिनीत घरे करून रहात होते. शत्रूचे आक्रमणे झाले की बिळातून जमिनीतील भुयारी घरातून बाहेर येऊन हे लोक हल्ले करत होते. आजही अशा प्रकारचे घरे पाकिस्तान अफगाणिस्तानाच्या बॉण्ड्रीवर आहे. त्यामुळे मूषक अर्थात उंदीर हे कुलचिन्ह या गणाचे असणे सहाजिक आहे.

  एवढे मात्र नक्की की व्यापारी लोकांनी हिंगलाज मातेला महाराष्ट्रात आणि एकूण भारतात आणले. जागोजागी तिचे ठाणे स्थापन केले. मुळची तशी ती मकारानची.




लेखक
नितीन सावंत परभणीकर
मो : 9970744142






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने